Saturday, August 1, 2009

होर्न ओके प्लीज़

एका टॅंकर च्या मागे लिहिलेल होत ,
कत्ल करो नजरो से तलवारो मे क्या रखा है
सफर करो टॅंकरो से कारो मे क्या रखा है :)

या ट्रक, लॉरी च्या मागे किती छान छान लिहिलेल असत नाही? हिंजवडिला आय टी पार्क कडे जाताना वाकड जवळ एक ट्रक बर्‍याचदा दिसतो. त्याच्या मागे लिहिलय

तेजस, वैशु, सचिन, रमेश, सुरेश, सायली, माया, चंदू
धन्य ते माता पिता

नावे नीट लक्षात नाहीत पण खरच त्या माता पित्यांना धन्य या पेक्षा दुसरी उपमाच देता येणार नाही.

सगळ्या ट्रक च्या मागे ' Horn OK Please' आणि 'मेरा भारत महान' असे का लिहिलेले असते हे मला आजतगायत न सुटलेले कोडे आहे. एकाने तर '100 मे से 80 बेईमान लेकिन फिर भी मेरा भारत महान' असे कटू सत्य लिहिले होते. मला ट्रक मागे लिहिलेले तत्वज्ञान् वाचायची सवयच जडली होती. ती सवय अमेरिकेत आल्यावरही कायम राहिली होती. ही पहा इकडची थोडी सुभाषिते :)

JESUS LOVES YOU
Everyone else thinks you are an a****le :)

I got this truck for my wife
Thought it was a pretty good trade

WIFE and DOG missing
REWARD FOR DOG

तसेच रस्त्यावर धोक्याची सूचना देणारे फलकही मजेदार असतात. हिमाचल मध्ये कुठेतरी हा फलक दिसेल
Please be soft on my curves
they are dangeorous
खाली अजुन काही साइन्स दिली आहेत.

Speed is a 5 letter word so is death
Slow is a 4 letter word so is life

Be Mr late
than LATE Mr.

Mind your brakes
or break your mind

घरी तुमची वाट पहात आहेत
तुमच्या अपघाताच्या बातमीची नाही

चला तर तुमच्याकडेही असली काही साइन्स असतील तर मला सांगा बघू.....

3 comments:

आदित्य said...

laal mirchi hirva deth
aThvaN aali ki punha bheT!

Anonymous said...

"Anaar Kali, Bhar Ke Chali"

"Atta Hoti Kuthe Geli"

And my fav.

" एकच शेंबडं पुरे !!"

Ketaki Abhyankar said...

एकदा मी कोल्हापूर हून सांगली ला जात असताना माझ्या गाडीच्या पुढे असलेल्या ट्रक च्या मागे लिहिले होते..
"मालिक की गाडी, ड्राइव्हर का पसीना,रोड पे चलती हैं, बनके हसीना"

तसेच एकदा मुंबई पुणे प्रवासात एका कार(?) च्या मागे लिहिले होते
"या जगात मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी जातात"