Saturday, August 8, 2009

तुम्हाला काय वाटते?

भारतीय क्रिकेट खेळाडूंनी वाडा च्या अटीन्वर सही करण्यास मनाई केलीय आणि BCCI त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय. त्यावरून विश्वभरात वादंग सुरू आहे. संपूर्ण क्रीडा विश्वाने त्या मान्य केल्या असताना हे कोण टिकोजीराव लागून आलेत असा ही सूर लावला जातोय. सानिया मिर्जानेही खिलाडू वृत्तीने त्या क्रिकेटपटुनी मान्य कराव्यात असे सुचवले आहे.

खेळाडूंचा मुख्य विरोध आहे तो आपला विश्रांती दरम्यानचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत. त्यांचा सामन्या दरम्यान आणि सरवा दरम्यान वाडाच्या उत्तेजक चाचणीला विरोध नाही आहे. मला वाटते ते एक प्रकारे योग्यही आहे. व्यक्‍तिगत स्वातंत्र्यावर गदा आणि सुरक्षितता ही दोन मुख्य कारणे त्यानी दिलीत. काही लोकांचा मुद्दा आहे की जर का क्रिकेट खेळाडूंनी विश्रांती दरम्यान उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले तर? मुद्दा बरोबर आहे, पण हेही लक्षात घेतल पाहिजे की क्रिकेट खेळाडू वर्षातले कमीत कमी दहा ते अकरा महिने क्रिकेट खेळतात. जर का त्यानी विश्रांती काळात उत्तेजक द्रव्य घेतले असेल तर पुढच्या सरावादरम्यान वा सामन्या दरम्यान घेतलेल्या चाचण्यात ते पकडले जायला हवे.

दुसरा मुद्दा सुरक्षिततेचा. रॉजेर फेडेरर सारख्या खेळाडूने या करावर सही केलीय. काही लोकांचे म्हणणे असे आहे की रॉजर ची सुरक्षा सुरक्षा नाही का? पण खरच तस आहे का? रॉजर त्याच्या देशात कुठल्याही सुरक्षेविना मॉल मध्ये वा सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतो. इतर देशांच्या क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या देशातील जनता भारतातील खेळाडूना भारतातील जनता जितका त्रास देते तितका नक्कीच देत नसेल. त्यामुळे भारतातील खेळाडूंना त्यांच्या हक्काचा विश्रान्तीचा काळ एन्जॉय करता आला पाहिजे. संपूर्ण जगाने त्या करारावर सही केली म्हणून क्रिकेटपटुनी सुद्धा केली पाहिजे अशी मागणी करणे चुकीचे आहे.

मला करारातील अटींबद्दल पुरेशी माहिती नाही परंतू वरकरणी तरी क्रिकेटपटुन्चा विरोध मला योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटते?

2 comments:

नसती उठाठेव said...

मला देखील तो करार आणि वाडाच्या अटी ह्याबद्दल फार माहिती नाही पण तरीही मी आपल्या खेळाडूंच्या मताशी सहमत आहे कारण एकतर हे लोक वर्षातून एखाद दुसरा महिना घरी असतात आणि भारतात तरी क्रिकेट ची तुलना दुसर्‍या खेळाशी आणि लोकप्रियतेशी होऊ शकत नाही. त्यामुळे क्रिकेट इतर खेळाडूंचे मत आणि क्रिकेटरचे मत ह्यात फरक बराच फरक असणे साहजिक आहे. ह्यांच्या नंतर दुसर कोणी बिज़ी असेल तर आपण IT वाले. :-) आपल्याला पण साला वर्षातून 2-3 आठवडे घरी जायला मिळता आणि ह्या 2-3 आठवाड्यामध्ये जर मला कोणी कामाचा स्टेटस विचारला तर माझी नक्कीच सटकेल. मी तरी घरी जातो तेंव्हा गावात रेंज नाही ह्या कारणाखाली मोबाइल बंद ठेवतो बुवा. तेव्हा जरा खेळाडूंच्या दृष्टीने विचार केला तर त्यांचे म्हणणे मला तरी पटते. अर्थात ह्या मागे त्यांच्यावरचे थोडे आंधळे प्रेम देखील आहे हे मी मान्य करतो. पण शेवटी जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे...