Thursday, July 30, 2009

मराठी माध्यम की English Medium???

अशा विवाद्पूर्ण विषयास हात घातल्याबद्दल अगोदरच माफी मागतो. या पोस्ट मध्ये व्यक्त केलेली मते पूर्णपणे माझीच आहेत आणि कुणाच्याही भाषाविषयक भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही.

पाल्याने कुठल्या माध्यमात शिकावे असला प्रश्न जर कुणी विचारला तर माझे उत्तर इंग्रजी माध्यम असे असेल. कमीत कमी माझी मुले (जेव्हा होतील तेव्हा) इंग्रजी माध्यमात (किंवा त्यावेळी जे माध्यम स्ट्रॉंग असेल त्यात) शिकतील. त्यामागे ज्या भाषेत दहावी नंतर पुढील कमीत कमी सहा वर्षे शिक्षण घ्यायचे आहे आणि ज्या भाषेत कदाचित निवृत्त होईपर्यंत काम कारायचे आहे अशा भाषेचा पाया सुरुवातीपासूनच मजबूत करणे हेच थोडक्यात कारण आहे. मान्य आहे की फक्त मराठीत शिकुनही निवृत्त होईपर्यंत मानाने जगता येईल, पण असे पर्याय फारच थोडे आहेत किंवा मला माहीत नाहीत. पण इंग्रजी भाषेत मराठी भाषेपेक्षा व्यावसायिक दृष्ट्या जास्त ज्ञान् आहे याबाबत कुणाचेही फारसे दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे हे ज्ञान् चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी इंग्रजीवर 'चांगले' प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

बर्‍याचशा मराठी शाळांमध्ये इंग्रजी पाचवी नंतर शिकवायला सुरूवात केली जाते आणि बर्‍याचशा विद्यार्थ्यांसाठी दहावीपार्यंत तो घाबरवणारा विषय राहून जातो. तसेच इंगजी संभाषणावर अगदी नगण्य मेहनत घेतली जाते. परिणामी जेव्हा तोच विद्यार्थी कॉलेज विश्वात प्रवेश करतो तेव्हा तो कुठेतरी तो थोडासा बुजलेला असतो आणि बर्‍याचशा केसेस मध्ये तो आपला आत्मविश्वासही हरवून बसलेला असतो. बरेच विद्यार्थी शेवटपर्यंत हा आत्मविश्वास परत मिळवू शकत नाहीत. कॉलेज मधील पहिली 1-2 वर्षे तर इंग्रजीशी जुळवून घेण्यात जातात. थोडक्यात उदाहरण द्यायचे झाले तर सुरुवातीचे काही दिवस त्रिज्या, परावर्तन, लम्बक, प्रकाश संश्लेषन, षटकोन म्हणजे अनुक्रमे radius, reflection, pendulum, photo synthesis, hexagon असतात हेच मुळी समजत नाही. हे एकदम साधे उदाहरण दिलय. बर काही शंका विचारायची झाल्यास ती इंग्रजीमधून न चुकता विचारता येईल हा विश्वास नसल्याने बर्‍याचशा शंका मनातच राहतात.

बरेच लोक यावर विवाद करताना म्हणतात की आम्ही सुद्धा यातून गेलोय, आम्ही यातून मार्ग काढलाय आणि आज आम्ही यशस्वी आहोत. आम्ही इंग्रजीत अगदी बाप नसू पण इंग्रजीवर चांगल्यापैकी प्रभुत्व आहे. हो मी म्हणतो त्याबद्दल वादच नाही. पण दहावीनंतर आपले बरेचसे एफर्ट्स हे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात खर्च होतात. कमीत कमी माझे तरी झालेत. हेच एफर्ट्स आणि खर्ची पडलेला वेळ अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता तर प्रोफेशनल लाइफ मध्ये कदाचित दुणावलेल्या आत्मविश्वासाने वावरता आले असते. तसेच सर्व मराठी माध्यमातील विद्यार्थी हे एफर्ट्स देऊ शकत नाहीत आणि बर्‍याच केसेस मध्ये आपले ग्रॅजुयेशनसुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. आता इंग्रजी माध्यमातील किती मुले ते पूर्ण करतात हा मुद्दा वेगळा, पण केवळ इंग्रजी संभाषणाच्या जोरावर त्यातली बरीचशी मुले कॉल सेंटर सारख्या क्षेत्रांमध्ये बर्‍यापैकी स्थिरावतात. थोडक्यात इंग्रजी माध्यमातील आणि मराठी माध्यमातील मुलांच्या मार्गाची तुलना खालील प्रमाणे करता येईल.
इंग्रजी माध्यम: शाळेत इंग्रजीत शिकाणे > कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी माध्यम: शाळेत मराठीत शिकाणे > कॉलेजमध्ये अगोदर इंग्रजीला सरावणे > नंतर कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकाणे > व्यावसायिक जीवनात इंग्रजीचा वापर करत वावरणे.
मराठी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज हे स्थित्यंतर इंग्रजी शाळेनंतर इंग्रजी कॉलेज या स्थित्यंतरापेक्षा मोठे आणि अवघड असते (10 पैकी कमीत कमी 8 जणांसाठी ).

इतके करूनही व्यावसायिक जीवनात comfortably वावरता येईल याची प्रत्येकाला शाश्वती नसतेच. उदा. मोठ्या ग्रूप समोर एखादे मोठे प्रेज़ेंटेशन देणे. शाळेत असताना पूर्ण भरलेल्या सभागृहात लोकमान्य टिळाकांविषयी चार शब्द सांगताना माझी कधी
तन्तरली नाही,पण आय टी मध्ये सुरुवातीला एखादे presentation देताना माझी फार फाटायची. इथे मला इतके लोक समोर बसलेत त्याचे टेन्शन नसायचे तर मी इंग्रजीत बोलताना चुकणार तर नाही ना याची भीती असायची.

बरेचसे लोक मराठी माध्यमातील बर्‍याचशा यशस्वी लोकांची उदाहरणे देतात (कदाचित लोक माझेही उदा देत असतील). त्यांच्यामते मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठीतून शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. मी म्हणतो इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठी भाषा का टिकवता येणार नाही? मराठीची गळचेपी होतेय आणि ती लवकरच मान टाकेल अशीही ओरड काही लोक करतायत. अरे अमृततेही पैजा जिंकणारी माझी मराठी अशी कशी मान टाकेल. Survival of the fittest हा काळाचा मंत्र आहे. माझी मराठी जर सशक्त असेल (जी ती आहेच) तर ती टिकणारच. पण जर काळाच्या ओघात ती जर लुप्त झाली तर मला वाईट जरूर वाटेल पण कालाय तत्स्मैएय नमः असे मानून ते ही मी स्विकारेन. ती पाळी येणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. माझ्यातर्फे ती टिकवण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेनच पण ज्या अडचणींचा सामना मला करावा लागला त्या अडचणींचा सामना पुढच्या पिढीला करावा लागणार नाही याचीही काळजी घेईन. मला पूर्ण खात्री आहे की मी माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवूनही मराठीची गोडी लावू शकेन. जर मराठी माध्यमातून शिकूनही इंग्रजीची पातळी इंग्रजी माध्यमाइतकी ठेवणार कोणता पर्याय असेल तर तो मी नक्कीच स्वीकारेन, पण तूर्तास तरी I will support the english medium education..

8 comments:

Anonymous said...

Absolutely 200% correct!!! I completed my education in marathi medium till SSC, but still faces some problems in vocabulary while speaking.

Anonymous said...

perfectly wright sorry right!
this happens due to marathi medium
but compulsry english in daily life

shakuntala said...

pan majhya mate marathi madhe shikun ani english talkingcha class lavala tari chalel

Amit said...

i totally agree with the author.
i also faced the same problem.
during my higher studies, i found myself low esteemed only because i could not speak like others.english is a need of an hour and if we want to survive and succeed in the world,we must know it.

Anonymous said...

will u stop this
my son in marathi medium & has got semi english, sanskrit hindi etc.
Sanskar is important & not popat pachi in english like marketing persons

Photographer Pappu!!! said...

शकुंतला अमित आणि 3 anonymous:) तुमच्या मतांबद्दल धन्यवाद. शकुंतला, इंग्लीश स्पीकिंग क्लास म्हणजेच एक्सट्रा एफर्ट्स. तसेच इंग्लीश स्पीकिंग क्लास ची विश्वासाहर्ता पाहता ते कितपत काम करेल या बाबतही शंकाच आहे.
तिसरे anonymous, लेखाच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते की कुणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नाही. तुमच्या कॉमेंट वरुन अस दिसत आहे की तुमचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे पण तुम्ही जिथे इंग्रजी 24 तास लागत नाही अशा ठिकाणी काम करता आणि इंग्रजी न येण्यामुळे तुमचे काही अडले नाही आहे ( माझे निरीक्षण चुकीचे असु शकेल). इंग्रजीशिवाय जिथे पानही हलत नाही तिथल्या लोकांना या लेखा मागची भावना समजेल. देव करो आणि तुमच्या मुलाला काही अडचणी न येवो, पण माझ्या माहितीतली बर्‍याच सेमी इंग्लीश मधल्या मित्रांची अवस्था मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे जरी साइन्स आणि गणित या विषयातील शब्द जरी इंग्रजीत असले तरी शिकवताना ते मराठीतूनच शिकवले जातात. तुमच्या म्हणाण्याप्रमाणे संस्कार आवश्यकच आहेत. त्यात इंग्रजी आणि मराठी मीडियम हा भेद नाहीच आहे. कदाचित भविष्यात तुमचा मुलगा जेव्हा तुम्हाला म्हणेल की तुम्ही मला पूर्ण इंग्लीश मीडियम मध्ये का घातले नाही तेव्हा तुम्हाला या लेखा मागच्या भावना कळतील. पण तो दिवस तुमच्यावर न येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Ajay Sonawane said...

मी प्रविण च्या मताशी बिलकुल सहमत आहे, उद्याच्या जगात जर टिकून रहायचं असेन तर इंग्लिश येणे गरजेचं आहे. इंग्लिश माध्यमात शिकून सुद्धा मराठी टिकवता जोपासता येऊ शकते.

-अजय

Anonymous said...

विषय आवडला आणि त्याअनुसंगाने मांडलेले मुद्देही.
पण थोडं पुढे जाऊन आणखी एक प्रश्न विचारावा वाटतो की आपण शिक्षणाच्या भाषेवरच का विचार करतोय, शिक्षणपद्धतीवर का नाही ? कारण ग्लोबलाईज्ड वातावरणात 'फाड-फाड इंग्रजी' बोलता येणं हेही पुरेसं नाही. खरंतर कल्पनाशक्‍तीचा विकास, 'प्रॉब्लेम सॉल्हिंग ऍटिट्यूड', बहुश्रूत व्यक्‍तिमत्त आणि हे सगळे व्यवस्थित मांडता येण्यासाठी इंग्रजीवर प्रभूत्व .. असं काहितरी देणारे शिक्षण हवं .. चारवर्षापूर्वी गुरूव्हिजनवर लिहिलेला वैदिक गणितावरचा लेख :http://blog.guruvision.in/?p=2 लेख आठवला.यामधे दिलेल्या युरोपातील शाळा किंवा पॉंडेचेरीमधील शाळा असे काही अनुसरातात. याच विषयावर आणखी साखळी लिखाण येऊ द्या !

जाताजाता : असच काहिसं शेतीप्रश्नांवर वर लिहितोय, कधितरी येऊन जावा !

- मी
http://TheLife.in