१. टूथपेस्ट्चा गळा आवळल्यावर दात घासण्यापुरती पेस्ट बाहेर आली. आज संध्याकाळी नवीन टूथपेस्ट लाना ही पडेगा (असं मी गेले ४ दिवस ठरवतोय, पण रोज जरूरीपुरती पेस्ट निघतेय)
२. सकाळी सॉक्समध्ये रोजच्याप्रमाणे पॅण्ट अडकली नाही.
३. सॅन फ्रान्सिस्को ट्रेन असूनही आज माझ्या शेजारची सिट मी उतरेपर्यंत रिकामी होती (हे म्हणजे ठाणे-व्ही.टी. (चुकलो, सी.एस.टी.) स्लो ट्रेनमध्ये कांजूरमार्ग ला २०० ग्रॅम सिट (म्हणजे चौथी) मिळणे)
४. तिसरा मुद्दा कदाचित पहिल्या मुद्द्याचा साईड इफेक्ट असू शकतो हे आता लक्षात येतय.
५. ऑफिसात दरवाजाजवळ बसणारी सोनेरी केसांची भटकभवानी (पहाव तेव्हा ऑफिसभर भटकत असते) आजही हसली नाही.
६. ऑफिसात आज काहिच काम नव्हतं. तीन तीन वेळा सेंड/रिसिव वर क्लिक करून देखील एकही मेल आलं नाही.
७. मायबोली आणि मराठीब्लॉग्ज, फ्लिकर, जी-मेल साईट्स ऑफिसात ब्लॉक्ड असल्याने वेळही जात नव्हता. अगदी हातची सगळी नखं खाऊन संपली पण वेळ जात नव्हता (पायात बूट असल्याने आणि पाय तोंडापर्यंत पोचत नसल्याने पायाची नखं वाचली)
८. भटकभवानी टॉक टॉक सॅण्डल वाजवत क्युबिकलच्या बाजूने गेली. जाताना गोड हसली.
९. लंच नंतर परत येऊन सेंड/रिसिव वर क्लिक केलं आणि व्होय्ला, एक मेल आलं. ऑफिसात असणाऱ्या रक्तदान शिबिराबद्दल रिमाईंडर होतं. मेल मधला शब्द न शब्द वाचून काढला.
१०. टाईमपास साठी रक्तदान करायचा विचार केला, पण १ बाटली रक्त दिल्यावर शुद्धीवर येण्यासाठी ४ बाटल्या चढवाव्या लागतील म्हणून बेत रद्द केला.
११. चार पाच मित्रांनी मिळून मग दिड तास चकाट्या पिटल्या.अबु आझमीच्या अल्लामुखात भडकावणे, भारत ऑस्ट्रेलियाकडून हरणे ते भटकभवानीचे टॉक टॉक चालणे यापर्यंत सर्व विषय चघळून झाले.
१२. शेवटी ५:३० ला घरी निघालो. ट्रेनमध्ये बाजूची सिट रिकामी नव्हती.
१३. शेवटी नवीन टूथपेस्ट घेतली.
१४. घरी आलो तर बायको ’The Perfect Bride’ बघत होती. हि डेली सोप बाकी डेली सोपप्रमाणेच डोक्यात जाते.
१५. म्हणून मग ’हा उनाड दिवस’ ब्लॉगवर उतरवून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवलं.
अजून वाचताय? तुमच्या पेशन्स ला सलाम :)
Monday, November 9, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
tumche post wachun mala aarasa dislyasarkha watala... mazahi divas javalpas asach jato.... fact ghari mazi bayko nasate. :)
छान, माझ्या शेजारची सीट लांबच्या प्रवासात मोकळी किंवा आजोबा-आजीने भरलेली असते. :-)
मस्त लिहलय राव... लगे रहो...
haa haa haa ...
Sahhi jhale aahe post, barech mudde maajhyaa rojachyaa aayuShyaashi juLaNyaasaarakhe aahet ;)
post aavaDale ...!!!
MAST
पप्पू शेट झक्कास झाली आहे पोस्ट. नशिबवान आहात, ऑफीस मध्ये उनाडायला/ मज्जा करायला मिळते तुम्हाला. मी देखील मागे माझ्या उनाड दिवसाबद्दल लिहाले होते पण आमचा दिवस ऑफीसला दांडी माराल्यामुळे उनाड गेला. बाकी सोनेरी केसांच्या भटकभवानीला नमस्कार सांगा आमचा!!!
chagale lihahle aahes. :)
Aani pesions baddal sangayache tar
kay karnaar, maza pun office madhye vel jaat nahi.;) Aani amachya ithe ajun tari site blocking suru nahi ( Touchwood )
Post a Comment