Saturday, September 19, 2009

कुणी सांगेल का?

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?
२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?
३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?
४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?
५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?
६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?
७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?
८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?
९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

तुर्तास इतकेच.... अजून प्रश्न पडले की याचा भाग-२ लिहेन :)

3 comments:

Mahendra said...

WOW!! Mast!!

Satish Gawde said...

१. अमेरिकेतून परत आलेल्या जवळपास प्रत्येकाच्या प्रत्येक वाक्यात ’अमेरिका’ एकदा तरी का डोकावते?

>> काय राव, तसं नाही केलं तर आम्ही "य़ू एस रीटर्न्ड" आहोत हे लोकांना कळणार कसं?

२. कुत्र्या मांजरांवर प्रेम करणारे चिकन/मटण बिर्याणी एकदम आवडीने कसे खातात?

>> कारण ते कोंबड्य़ा आणि बोकडांवर प्रेम करत नाहीत.

३. ABCD (a.k.a. low waist) जीन्स घालणाऱ्या मुली बसल्यावर सारख्या सारख्या मागून टी-शर्ट का खाली खेचत असतात?

>> आधीच काहीतरी उघडं आहे म्हटल्यावर लोकांच्या नजरा तिकडे जाणार. आणि जे उघडं आहे ते झाकायचा प्रयत्न होतोय म्हटल्यावर "काय बरं झाकण्याचा प्रयत्न होतोय" अशी जाणून घेण्याच्या ईच्छेने अधिक नजरा तिकडे वळणार.

दूहेरी फायदा !!!

४. बाजू बाजूच्या क्युबिकल मध्ये बसणारे एकमेकांशी डायरेक्ट न बोलता messenger किंवा e-mail द्वारे का बोलतात?

>> बर्‍याचशा बॉसना असं वाटतं की, रीसोर्स मॉनिटरमध्ये डोकं खुपसून आहे म्हणजे काम करतोय. आणि शेजारच्याशी बोलतोय म्हणजे टाईमपास करतोय. अशा वायझेड बॉसना ** बनवायचा अतिशय सोपा उपाय - ई-पत्र किंवा निरोप्या वापरणे.

५. समोर उघडेबंब गणराय दिसत असताना दर्शनाच्या रांगेतील एक माणूस स्वत: घातलेला शर्ट दुसऱ्याला दाखवत "हा शर्ट गणपतीला शिवला" असं का सांगत होता?

>> मराठी भाषा वळवाल तशी वळते, दुसरं काय?

६. विषाच्या बाटलीवर expiry date असते का?

>> विषाची परीक्षा घ्यायची नसते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं काहीही असलं तरी काहीही फरक पडत नाही.

७. पुण्यात दुचाकीवरील ९९% मुली संपूर्ण तोंडाला स्कार्फ बांधून अतिरेकी का बनलेल्या असतात? प्रदूषण हे उत्तर असेल तर त्याचा त्रास पुरुष वर्गाला होत नाही का?

>> पुण्याला एक "वेगळीच" ओळख आहे, एक "वेगळेपण" आहे. हा प्रकारही त्या "वेगळेपणाचा" भाग असावा.

("वेगळेपण" हा शब्द माझ्या एका पुणेरी मित्राने मला पुणे पुराण ऐकवताना वापरला होता.)

८. काही माणसं आपल्याला मोबाईलवर फोन करून कोण बोलतय असं का विचारतात?

>> फोन करणार्‍या माणसाचा असा समज असावा की तुम्ही मोबाईल शेअरींग मध्ये वापरताय. त्यामुळे हा कॉल कोण अटेंड करतंय हे कळावं म्हणून :प

९. (कविता करणाऱ्या सर्वांची माफी मागून) ब्लॉगवर ९०% हून अधिक लोक ओढून ताणून यमक जुळवून वा मुक्तछंद वापरूनच कविता का करतात?
>> र ला र आणि ट ला ट जोडून रट रट करणे खुप सोपं असतं. लेखणी उचलून कागदावर मुक्तपणे ओढणं तर अजून सोपं...

१०. कुठल्याही मुलीला propose केल्यावर तिचं पहिलं उत्तर ’मी तुला त्या नजरेने कधी पाहिलच नाही’ हेच का असतं?

>> "दृष्टी"कोन "बनवावा" लागतो.

प्रविण, प्रश्नांची उत्तरे हलकेच घे रे बाबा !!!

Photographer Pappu!!! said...

Mahendra ji, Pratikriyebaddal Abhaar :)

Satish, mee kadhich jad pratikriya ghet naahi :) Thanks for answering the questions.