Thursday, September 3, 2009

इट्स माय कप ऑफ टी!!!!!!

दिड आठवड्याच्या सुटटीत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस केली असेल तर ती म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचा चहा. इकडे बे एरियात फुटा फुटाला देसी रेस्टॉरंट्स आहेत पण ज्या अमेरिकन खेड्यात गेलो होतो तिकडे एकही नव्हतं. एखाद्या अटटल दारुड्याला आठवडाभर दारु न मिळाल्यास त्याची जी अवस्था होईल त्याहीपेक्षा वाईट अवस्था माझी झाली होती. नाही म्हणायला चहाच्या वेळेला कॉफी ढकलत होतो गळ्याखाली, पण सकाळ संध्याकाळ चहा ढोसण्यात जी मजा आहे ती कॉफी ढोसण्यात नाही. तुलनाच करायची झाली तर ते विलायती दारुची तहान हातभटटीच्या दारूवर भागवण्यासारखे होते.

प्रवीण पाताडे उर्फ मी म्हणजे अटटल चहाबाज. १९९८ ते २००१ च्या दरम्यान दिवसाला जवळपास १६-१७ कप चहा सहज रिचवणारा माणूस. आयुष्यात सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही, पण चहा म्हणजे जीव की प्राण. १९९८ च्या अगोदरही मला चहा आवडायचा पण दिवसाला दोन कप, घरी जेव्हा बनत असे तेव्हाच. १९९८ ला घरापासून दूर बंगलोरला सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणून विप्रो कंपनीत रुजू झालो. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी २४ तास चहाची सोय करून ठेवली होती (हो, तेव्हा विप्रो आतासारखी चिंधीगिरी करत नव्हती ). सकाळी ९ ते ६ कँटीन मध्ये चहा मिळायचा आणि रात्री २ मोठे थर्मास प्रत्येक फ्लोअरवर ठेवायचे. त्यापैकी सकाळी ९ चा आणि दुपारी २ चा चहा कँटीन वाला नायर जागेवर आणून द्यायचा. माझ्या मते तो मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील प्यालेला सर्वोत्तम चहा होता. त्यामुळे रात्री कितीही उशीर झालेला असला तरी तो चहा पिण्यासाठी मी ९ च्या आत ऑफीसला टच होत असे. काम करता करता मी पार्ट टाईम एम.एस. सुद्दा करत होतो. दिवस कामात (आणि टी ब्रेकमध्ये) कसा निघुन जायचा ते कळायचं नाही, त्यामुळे रोज रात्रभर जागून अभ्यास करणे भाग असायचे. मग संध्याकाळी सहा ते रात्री दोन अडीज पर्यंत जवळपास तासाला दोन या हिशेबाने मी चहाचे कप रेटायचो.

मग जणू ते व्यसनच जडलं. पहिला प्रॉब्लेम २००१ मध्ये जेव्हा मी कॅनडाला गेलो तेव्हा आला. जाताना मी चहा पावडर वगैरे घेऊन गेलो होतो. सकाळ संध्याकाळ घरी चहा व्हायचा पण ऑफीसमध्ये पंचाईत व्हायची. मग तिकडे लिप्टनची डिप चहा प्यायचो, पण त्याने तलफ काही जायची नाही. हळू हळू घरातली पावडरही संपली. देसी स्टोर १०-१५ मैलांवर होतं आणि माझ्याकडे गाडी नव्हती. टी टाईम मध्ये मी लिटरली फ्रस्ट्रेट होत असे. मी तिकडच्या एक गोऱ्याला मस्करीत म्हटलही होत की कसला देश आहे तुमचा, साधी चहा मिळत नाही इथे. त्या माणसाने देसी स्टोर शोधून माझ्या वाढदिवसाला रेड लेबल चहाचा मोठा पॅक आणून दिला होता. माझ्या मते ते आजवरचं सर्वात बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे.

कॅनडाच्या ट्रिपमुळे माझं चहाचं प्रमाण ४-५ कप वर आलं होतं, पण चहा पिणं मला अतिशय आवडू लागलं होतं. कोणीही दिवसाच्या कुठल्याही वेळेला चहाचं आमंत्रण दिलं तर मी ते आनंदाने स्वीकारत होतो. माझ्या बायकोने जेव्हा ती माझी गर्ल्फ्रेंड होती तेव्हा विचारलं होतं कि तुझ्या आयुष्याच्या प्रायोरिटिज काय आहेत. मी म्हटलं की चहा, बाईक, फोटोग्राफी फ्रेंड्स/फॅमिली आणि काम.
"मग माझा नंबर कुठे लागतो" - आमच्या (तेव्हा नसलेल्या) सौ.
मी म्हटलं, " बाईक नंतर... "
नंतर काय झालं ते तुम्ही ओळखलं असेलच :) आमच्या घरात किचनमधली मी उचललेली एकमेव जबाबदारी म्हणजे चहा बनवणं :) सध्या चहाचं प्रमाण दिवसाला २-३ कपांवर आलय, पण आजही चहा माझा जीव की प्राण आहे आणि कोणी ऑफर केला तर मी आजही नाही म्हणत नाही. कुठल्याही लॉन्ग ड्राईव्ह ची मजा टपरीवर चहा प्याल्याशिवाय येत नाही, पण दुर्दैवाने इकडे चहाच्या टपऱ्याच नाहीत. त्यामुळे दिड आठवडा मी चहासाठी वखवखलेला होतो (वखवखलेला शब्द प्रयोग चालेल ना?) कोणी सांगितलं असतं की याचा खून कर मी तुला चहा देतो तर मी खूनही केला असता (भावना लक्षात घ्या, मी काही खून वगैरे करणार नाहीय:)). त्यामुळे दिड आठवड्यानंतर आल्यावर घरात पहिली गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे चहा टाकणं, आणि हो, हा चहा माझ्या बायकोनं टाकला होता :)

10 comments:

Anonymous said...

चहा म्हणजे माझा पण जीव की प्राण. चहा नसेल तर अगदी वेड लागायची वेळ येते, म्हणुन तुमच्या भावना समजु शकतो. माझं पण चहाचं वेड अगदी लहानपणापासुनचं..अगदी ३ वर्षांचा असतांना पासुनच चहा पिण्याची सवय लागली होती.एकदा तर आईने रागाने चांगला चार कप चहा पाजला होता, आणि मी तो प्यायलो पण होतो.. :)
अजुनही दिवसाला कमित कमी १५ कप तरी होतो. आता फक्त वयोमाना प्रमाणे बिन साखरेचा + शुगर फ्री असतो.. :(

सिद्धार्थ said...

अहो जरा चार सहा कप चहा अजुन रिचवा आणि दीड आठवडा कुठे भटकून आलात त्यावर एक पोस्ट होऊन जाऊद्या...

Anonymous said...

मनापासून सांगतो वाईट वाटून घेऊ नका... पण खरोखरच चहाचे एवढे वेड असलेल्या व्यक्तीला पाताडे ह्या पेक्षा पिताडे हे आडनांव जास्त शोभून दिसते... मी ही तुमच्यासारखाच एक होतो पण फारसे चहाविना बिघडत नाही आजकाल...

कारण मलाही एक व्यसन आहे...

कोणतीही कृती व्यसनासारखी नियमीत जाणवली की ती सोडून द्यायचे...

सतीश गावडे said...

हाहाहा... चला कुणीतरी भेटला माझ्यासारखा चायक्कड... मीही काल परवापर्यंत पाणी कमी आणि चहा जास्त पीत असे...

पण मग माझ्या एका मित्राने मला हा ऍनॉनिमस म्हणतोय तसाच सल्ला दिला "कोणतीही कृती व्यसनासारखी नियमीत जाणवली की ती सोडून द्यायचे" आणि मी चहा पिणं कमी केलं...

Photographer Pappu!!! said...

महेंद्र जी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासारख़्यांचा प्रतिसाद आला की अंगावर मूठभर मांस चढ़त :)

सिद्धार्थ, प्रयत्न करेनच सुट्टीवर लिहिण्याचा, कधी ते मात्र नक्की नाही. आजकाल पार्श्वभागी आग लागलेली आहे :) मोठी सुट्टी घेतली ना :)

अनामिका, अस काटेकोर जगायच जमणार नाही रे आपल्याला. एखाद तरी व्यसन हवच ना रे आयुष्यात :)

सतीश बहुतेक तू ही बे एरियात आहेस, मग कधी बसूया प्यायला?? .... चहा रे .. :)

सतीश गावडे said...

हो रे... मी बे एरीयातच आहे... तुझ्यापासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर (मित्राच्या कारने बरं... माझ्याकडे कार नाही नव्हे, मी कार घेतली नाही :) )

नाझ ८ ला येतो मी बरेचवेळा...

अरे हा... मी सॅन रॅमॉनला राहतो... तुझ्याकडून ६८० दक्षिण मुक्तमार्गावर :)

Photographer Pappu!!! said...

Arre I stay next to naz8 :), I used to stay in san ramon near market place and work for AT&T. my email id is pravin.patade@gmail.com

Anonymous said...

अरे सही.....चहा ची चहा करणारे अजुन काही जण....मी पण चहाबाज त्यामुळे ’मी खुन केला असता’ वगैरे तुझे विचार समजू शकते....ताच विषयाची मी पोस्ट टाकलीये ’Camellia Sinensis'....वेळ मिळाल्यावर वाचून प्रतिक्रीया नक्की दे....

Pankaj - भटकंती Unlimited said...

Priority आवडली: चहा, बाईक, फोटोग्राफी फ्रेंड्स/फॅमिली आणि काम :-D

माझी आहे भटकंती, फोटोग्राफी, फॅमिली. सगळे इक्वली prioritized. बायकोला (होणाऱ्या)पण सांगून ठेवलंय... वीकेंडचा एक दिवस तुझा आणि एक कॅमेरा प्लस भटकंतीचा!!!

Shardul said...

Mitra... ekada ekade chakkar maar.... tasa mi aalashi aahe...pan kas tuzyasathi mi chaha banawen... !!!

Apratim lihila aahe :)